प्रामाणिक कामाची दखल : सचिन ढोले यांना सवोत्कृष्ठ उपजिल्हाधिकारी पुरस्कार घोषित


पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांशी समन्वय ठेवत  नियमाप्रमाणे काम करणारे अधिकारी अशी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची ओळख आहे. मागील चार महिन्यापासुन कोरोनाच्या संकटात देखील  शासनाच्या नियमाप्रमाणे काम करीत प्रांताधिका-यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपुलकीची भावना  निर्माण केली आहे.  याचीच दखल घेत प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने " सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी" हा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला. 
नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी प्रांताधिकारी यांचा सत्कार केला.


भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच महसूल दिन यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये सचिन ढोले यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 
प्रांताधिकारी सचिन ढोले गेल्या अडीच वर्षापासून पंढरपूर मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट महसूल प्रशासन तसेच पंढरपूरच्या वारीचे योग्य नियोजन, मागील वर्षी आलेला महापूर तसेच सध्या कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात देखील त्यांनी केलेले चांगले नियोजनची दखल प्रशासनाने घेतली. याचबरोबर त्यांनी   भूसंपादनाची प्रक्रिया जलद राबवत रस्त्याच्या कामांना गती दिली. या सर्व बाबींचा विचार करूनच जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
महसुल प्रशासनाचे वतीने तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी प्रांताधिकारी यांचा सत्कार केला. यावेळी नायब तहसिलदार सुरेश तिटकारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, मंडलधिकारी वाघमारे व मुजावर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई