आ सुभाष देशमुखांनी बांधली महिला पोलीस उपायुक्तांना राखी

रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा ! अशीही व्यक्त झाली कृतज्ञता !! वास्तव न्यूज ......... वास्तव बातमी ..... !...




 कोरोनाकाळात शहराचे रक्षण 
केल्याने व्यक्त केली कृतज्ञता !
  
 सोलापूर (प्रतिनिधी)
 कोरोना संकटाच्या काळात आ. सुभाष देशमुख यांनी दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा सण मोठा साजरा न करता अनोख्या पद्धतीने साजरा केला. या काळात संपूर्ण शहरवासियांचे रक्षण करणार्‍या  महिला पोलिस उपायुक्त  डॉ. वैशाली कडूकर यांना स्वतः आ. देशमुख यांनी राखी बांधत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महापौरांसह अन्नपूर्णा योजनाच्या कर्मचार्‍यांनी आ. देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.

 दरवर्षी आ. सुभाष देशमुख रक्षाबंधन सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. संपूर्ण मतदारसंघातील शेकडो भगिनी आ. देशमुख यांना राखी बांधण्यासाठी येतात. मात्र यंदा कोराना महामारीचे संकट असल्याने आ. देशमुख यांनी सर्वांना दूरध्वनीवरून सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. देशमुख यांनी अनोखा उपक्रम राबवत कोरोना काळात संपूर्ण शहरवासियांचे  रक्षण करणार्‍या महिला पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन राखी बांधली आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आ. देशमुख यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या घरीही जात राखी बांधून घेतली. तर विकासनगर येथील त्यांच्या कार्यालयात महिला कर्मचार्‍यांनी आ. देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.
 यंदा कोरोनाचे संकट असल्याने रक्षाबंधन सण साजरा करता आला नाही. रक्षाबंधनादिवशी  भावाने आपले रक्षण करावे  म्हणून बहिण भावाला राखी बांधते. मात्र सध्या कोरोनाच्या काळात संपूर्ण सोलापूरवासियांचे रक्षण महिला पोलिस उपायुक्त डॉ. कडूकर करत आहेत.  त्यामुळे त्यांना  राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली, असे आ. देशमुख यांनी सांगितले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई