अन सदाभाऊंना आली पंढरपूरची आठवण






पांडुरंगाला दुधाचा अभिषेक घालुन केली दुध आंदोलनाची सुरुवात


पंढरपूर / प्रतिनिधि



मागील पाच - दहा वर्षाचा इतिहास बघितला तर पंढरपूर अन आंदोलन हे समीकरण बनले आहे.  रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंञी सदाभाऊ खोत यांचे तर पंढरपूर करांशी जिव्हाळ्याचे नाते होते.  सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये असताना त्यांच्या प्रत्येक आंदोलनाची सुरुवात पंढरपूर मधुन होत होती. अन पंढरपूर राज्यभरातील आंदोलनाचा‌ केंद्रबिंदु‌ ठरत असे. माञ मागील पाच वर्षाच्या कालावधीत सदाभाऊ खोत हे राज्यमंञी बनले अन पंढरपूर करांशी असलेला त्यांचा संपर्क कमी झाला. सध्या सत्ताबदल झालेने भाऊंचे  मंञीपद गेले अन भाऊंना पंढरपूर ची आठवण येऊ लागली आहे. 
   आज शनिवार १ आॅगस्ट रोजी सदाभाऊ खोत हे सकाळी पंढरपूर मध्ये दाखल झाले.  अन नामदेव पायरी येथे पांडुरंगाला दुधाचा अभिषेक घालत दुध आंदोलनाची सुरुवात केली.  या अगोदर भाऊ  हे पंढरपूर मध्ये आलेवर १०० - २०० कार्यकर्त्यांची गर्दी असायची. माञ आज ही गर्दी पहायला मिळत नव्हती. 



 सकाळी सदाभाऊ खोत यांनी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन केले. यानंतर   महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या चरणी दुधाचा अभिषेक घातला.  या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान  व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा...विठ्ठला असे पांडुरंगाच्या चरणी सदाभाऊ खोत यांनी साकडे घातले.
       राज्यामध्ये रोज १ कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. ६० लाख लिटर दूध पिशवी बंद मध्ये विक्री होत आहे. ५० लाख लिटर दुध अतिरिक्त असून त्याची दूध भुकटी तयार केली जात आहे. सध्या गाईच्या दुधाला २० रुपये लिटर भाव आहे. तरी मागील देवेंद्रजी फडणवीस सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये थेट अनुदान दिले होते व भुकटीला ५० रुपये निर्यात अनुदान दिले होते. याच धर्तीवर या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे अशी मागणी केली. परदेशातून भुकटी आयात केलेली नाही परंतु या सरकार मधील काही लोक जाणीव पूर्वक कांगावा करत आहेत त्यांनी आधी शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
      यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के   उपस्थित होते...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई