टाकळीच्या सरपंचाना दणका....


टाकळीच्या सरपंचांना आयुक्तांचा दणका !


   अपात्रतेची कारवाई !! 
प्रदीर्घ काळ चालला होता लढा !


पंढरपूर, प्रतिनिधी :   टाकळी ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त ठरलेल्या सरपंचाला  दणका  बसला आहे. सरपंच नूतन उद्धव रसाळे यांना सरपंचपदावरून काढून टाकण्याचा आदेशा सोबतच सदस्य अपाञेची कारवाई  पुणे  विभागीय आयुक्तांनी केलेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
पंढरपूर शहरा लगत असलेल्या  टाकळी ग्रामपंचायतीमध्ये पूर्णपणे सावळा गोंधळ सुरु होता.  अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार असे गंभीर स्वरूपाचे आरोप घेऊन परमेश्वर देठे, महादेव देठे हे गेल्या काही वर्षांपासून लढा देत होते. अत्यंत गंभीर प्रकरण असूनही केवळ तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते परंतु सरपंचावर कारवाई व्हावी अशी मागणी परमेश्वर देठे आणि महादेव देठे यांनी प्रशासनाकडे केली होती. सबळ पुरावे जमा करून ते प्रशासनाकडे दिले होते. हे प्रकरण अखेर पुणे विभागीय आयुक्तापर्यंत पोहोचले आणि या प्रकरणाचा निकाल  लागला. 
 लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर सार्वत्रिक  निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून  आमदार भारत भालके  गटाच्या  सौ नूतन रसाळे  या  निवडून आल्या होत्या.  ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित असल्याने सौ नूतन  रसाळे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती.  सरपंच या भ्रष्ट कारभार करीत असलेची तक्रार  विद्यमान उपसरपंच महादेव मारुती देठे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक परमेश्वर देठे व इतर सहा ग्रामपंचायत सदस्यांनी  गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्याकडे केली होती. याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक सुभाष माने जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये सदर भ्रष्टाचाराबाबत लक्षवेधी मांडून आवाज उठवला होता. तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करणेचे आदेश दिले होते.

   गट विकास अधिकारी सांगोला यांनी चौकशी करुन  अहवाल  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिला. सदरच्या अहवालावरती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामसेवक  येलपले, ग्रामसेवक  भोसले, ग्रामसेवक  मोरे यांना लगेच निलंबित केले  व सरपंच सौ नूतन रसाळे यांना दोषी धरून त्यांचे वरती बडतर्फ करणे बाबत  विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे  ग्रामपंचायत अधिनियम ३९ प्रमाणे  अहवाल पाठवला होता. सदर अहवालावरती विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे मागील  वर्षभरात अनेक वेळा सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन विभागीय आयुक्त   म्हैसकर यांनी  सरपंच सौ नूतन रसाळे यांना दणका देत कारवाई केली.  या निकालाने टाकळी परिसरात जल्लोष करण्यात आला असून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
----------

वास्तव न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई