खाजगी हाॅस्पिटलमधील दोन कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल
अपेक्स हाॅस्पिटलच्या दोन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल
कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणा-या कर्मचारी व डाॅक्टरवर गुन्हे दाखल करणार : प्रांताधिकारी
पंढरपूर / प्रतिनिधि
कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जुन महिन्यापासुन कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पंढरपूर शहरातील हास्पिटल मध्ये रुग्णांवर उपचार करणेसाठी शहरातील सहा हास्पिटल ताब्यात घेतले आहेत. माञ या हास्पिटल मधील कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कडक कारवाई करत अॅपेक्स हास्पिटल मधील दोन कर्मचा-यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या हास्पिटल मधील सिस्टर व वाॅर्डबाय या दोघांविरोधात नायब तहसिलदार विजय जमादार यांनी गुन्हा दाखल केला आहे.
*खाजगी रुग्णालयातील कर्मचारी व डाॅक्टरांनी तात्काळ वैद्यकीय सेवा देवुन रुग्णांचे जीव वाचवावेत. अन्यथा कर्मचारेंसह डाॅक्टरवर देखील शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा