प्रशासनाने दिला पंढरपूरकरांना विश्वास....


रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्यासाठी नागरिकांचा उस्फुर्त सहभाग


पंढरपूर / प्रतिनिधि : जुन महिन्यापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या पंढरपूर शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व  पाॅझिटिव्ह रुग्णांना अलग करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान पंढरपूर मध्ये संचारबंदी केली आहे. या संचारबंदीचे सध्या कडकपणे अंमलबजावणी सुरु असली तरी प्रशासकीय अधिका-यांनी पंढरपूर वासियांची मने जिंकली आहेत. यामुळेच सध्या शहरातील नागरिक अॅन्टिजेन टेस्ट करण्यासाठी स्वत:हुन पुढे येत असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. 
 प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी सर्व शासकीय यंञणांमध्ये समन्वय ठेवला आहे. यामुळेच नगरपालिका, पंचायत समिती, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी एकदिलाने काम करत आहेत.
    पाॅझिटिव्ह रुग्णांना लक्षणे जाणवत नसतील तर संबधित रुग्णांना होम‌ काॅरनटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळेच रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्यासाठी मनिषा नगरमध्ये नागरिकांनी रांग लावली आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सहाय्यक मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर, पो नि प्रशांत भस्मे, सपोनि प्रशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिक्षक डाॅ जयश्री ढवळे  हे सर्व अधिकारी समन्वयाने काम करत असल्यामुळे पंढरपुरांना विश्वास निर्माण झाला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई