उद्योगपती अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ४० गावात विविध कार्यक्रम

पंढरपूर तालुक्यातील कोरोना योद्याचा सन्मान .
पंढरपूर/ प्रतिनिधि

धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.अभिजीत आबा पाटील यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ४० गावामधील ग्रामपंचायत शिपाई, व आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका,यांचा कोविड योध्दा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अभिजीत आबा पाटील मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्त  देगाव व पंढरपूर या ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले.  यामध्ये ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.  पुढील काही दिवस ही  ठिकठिकाणच्या गावामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे असे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले.

याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील वाखरी, देगाव, सुस्ते, उपरी, अजनसोंड, मगरवाडी, रोपळे, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, चिंचणी, खेडभाळवणी, पळशी, नांदोरे, आव्हे यासह ४० गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सॅानिटायझर, मास्क वाटप, खाऊ वाटप, मातोश्री वृध्दाश्रम, पालवी, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम अशा विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. 

कोरोनाच्या संकटात नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध गावात आरसेनीक अल्बम गोळ्याचे वाटप केले. कोरोना च्या काळात ज्या आशावर्कर , आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जी कामगिरी बजावली त्यामुळे त्यांना भेटवस्तू देऊन कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले यावेळी  डिव्हीपी उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवारांनी कार्यक्रम पार पाडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई