अपेक्स व गॅलेक्सी हास्पिटल च्या ९ कर्मचारेंवर गुन्हा दाखल

पंढरपूर प्रशासनाची कठोर कारवाई....

पंढरपूर / प्रतिनिधी

सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन उपाययोजना करत असले तरी  रुग्ण वाढत असलेने अखेर ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान संचारबंदी करण्यात येणार आहे.
   रुग्णांवर तात्काळ उपचार मिळणेसाठी शहरातील खाजगी हाॅस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. माञ या हाॅस्पिटलमधील कर्माचारी कामावर येत नसलेने अखेर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी या कर्मचारेंवर कारवाई सुरु केली आहे.  आज. अपेक्स व गॅलेक्सी हाॅस्पिटलच्या ९ कर्मचारेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अपेक्स हाॅस्पिटलच्या दोन कर्मचारेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

शहरातील डाॅक्टर व कर्मचारेंनी रुग्णावर उपचार करावेत.  कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला अथवा कामावर येण्यास टाळाटाळ केल्यास संबधित कर्मचारेंसह डाॅक्टरांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई