पंढरपूरकरांना दिलासा : १४७१ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत


प्रशासनाचे योग्य नियोजन अन नागरिकांचे सहकार्य

पंढरपूर / प्रतिनिधि : जुन महिन्यापासुन पंढरपूर शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनाला शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे तब्बल १४७१ रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी परतले आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९% झालेने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
       मे  महिन्यापासुन तालुक्यात  पहिला रुग्ण सापडलेने एकच खळबळ उडाली होती. यावेळी देखील प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे एक महिन्यात आतच पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झाला होता. माञ जुनच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली होती. 
    आज अखेर पंढरपूर शहर व तालुक्यात एकुण २१३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी १४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असुन ६१९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी शहरातील ३४५ व तालुक्यातील २७४ रुग्णांचा समावेश आहे. याचबरोबर आजपर्यंत ४० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
   प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तहसिलदार वैशाली वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ एकनाथ बोधले,  वैद्यकीय अधिक्षक  डाॅ जयश्री ढवळे, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर, पो नि प्रशांत भस्मे, सपोनि प्रशांत पाटील, सहाय्यक मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांचेसह कर्मचारी एकदिलाने काम करीत आहेत. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९% झालेने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
     

सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी माजी आ सुधाकरपंत परिचारक व राजुबापु पाटील यांचा कोरोनामुळे  मृत्यु झालेची खंत कायम मनात राहणार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई