राहुल जगताप यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी निवड





  पंढरपूर  : वांगी नं. १ (ता. करमाळा) येथील पै. राहुल जगताप यांची कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या तालुका प्रमुखपदी निवड झाली. निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष पै. गणेश मानुगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले. यावेळी कुस्ती-मल्लविद्या पै. सोमनाथ चव्हाण, राहुल वाघमोडे, कुस्ती निवेदक युवराज तात्या केचे आदींसह कुस्तीपटू उपस्थित  होते.
पै. राहुल आबा जगताप हे पुर्वी शिवनेरी तालीम अकलूज येथे वस्ताद कै. दत्ता आप्पा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. राहुल जगताप यांचा स्वभाव अत्यंत सरळमार्गी, स्पष्ट, एखाद्या होतकरूच्या मागे थांबणारे त्यामुळे एकदा त्यांच्या सहवासात आलेला माणूस सहजासहजी लांब जात नाही. प्रत्येक माणसाशी आदरार्थी वागणे हे एक त्यांचे गुणवैशिष्ट्ये. अशा अनेक गुणांमुळे तरुणांचे संघटन त्यांच्यामागे भरपूर आहे. शिवजयंतीनिमित्त दरवर्षी वांगी येथे पैलवान युवराज मामा रोकडे, पै. सत्यवान सरडे उर्फ पप्पू आण्णा, पै. आबा दैन, पै. लखन पाटोळे, पै. नाना तकिक, पै. रामा गायकवाड, पै. हर्षद दिवटे अशा अनेक तरुण पैलवानांना राहुल जगताप हे एकत्र येऊन महाराष्ट्रातील काटा जोडीतील कुस्त्याचे नियोजन पार पाडतात. राहूल जगताप यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील सर्व कुस्ती शैकिनांमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून सर्वञ त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई