पंढरपूरने‌ पार केली‌ शंभरी....

आज नवीन ३० रुग्णांची भर... एकुण ११८  रुग्णांपैकी ३९ रुग्णांना डिचार्ज


पंढरपूर / प्रतिनिधि


कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत गुरुवारी शहर व तालुक्यात  तब्बल ३० रुग्ण वाढले आहेत. यामुळे एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११८ वर पोहचली आहे.  यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव‌ वाढत असल्याने चिंता वाढली आहे. 
    माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे ११८ पैकी ३९ रुग्ण ठणठणीत झाले असुन त्यांना डिचार्ज देण्यात आला आहे. तर शहरातील दोन रुग्ण मयत झाले असुन सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत पंढरपूर शहरात ८२ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले असुन यापैकी २ मयत तर  २२ बरे झाले असुन ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात आजपर्यंत २८ रुग्ण सापडले असुन ११ बरे झालेने १७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याचबरोबर इतर तालुक्यातील ८ रुग्ण असुन यांचे पंढरपूर कनेक्शन आहे. यापैकी ६ बरे झाले असुन २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

गुरुवारी शहरातील, महापुर चाळ संतपेठ,, घोंगडे गल्ली,  अंबाबाई पटांगण, गांधी रोड,    ज्ञानेश्वर नगर येथे ४,  अनिल नगर, व्यासनारायण झोपडपट्टी, उत्पात गल्ली, गोविंदपुरा, रोहिदास चौक, जुनिपेठ, जिजाऊ नगर, ईसबावी,  उमदे गल्ली,     तर तालुक्यातील   कान्हापुरी येथे ५,  एकलासपुर, भोसे  गावांमध्ये रुग्ण सापडले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ एकनाथ बोधले यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई