संत नामदेव महाराजांच्या वंशजावरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन




विश्व वारकरी सेनेचे आमरण उपोषण स्थगित
गुन्हे मागे घेण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

पंढरपूर / प्रतिनिधि


 वारकरी संप्रदायाला भजन कीर्तनास विना अट परवानगी द्यावी , राज्यातील मंदिरे खुली करावीत आणि संत नामदेव महाराजांच्या वंशजावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आदी मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पंढरपूरमध्ये कालपासून सुरू केलेले  आमरण उपोषणा आज प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर स्थगित करण्यात आले . प्रांताधिकारी सचिन ढोले विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप जगन्नाथ महाराज देशमुख, हभप गणेश महाराज शेटे, हभप तुकाराम महाराज चवरे आदीमध्ये सविस्तर चर्चा होऊन मागण्याचे निवेदन शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला . महाद्वार काल्या दिवशी संत नामदेवांच्या वंशज व मदन महाराज हरिदास यांचेवर दाखल केलेला गुन्हा देखील मागे घेण्यास प्रशासनाने तयारी दाखवल्यानंतर तोडगा निघाला . 
       वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार होत नसल्याने तात्काळ मागण्या मान्य होत नसल्याने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील २९ जिल्ह्यातुन १ लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतील असा इशारा विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी दिला होता.  या आंदोलनाला राज्यातील अनेक वारकरी संघटनांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दिला होता.   

  प्रमुख मागण्या 

१) संत नामदेव महाराजांच्या वंशजांवर महाद्वार काल्यादिवशी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत 
२) गोकुळ अष्टमी पासून नियम अटी लावून ५० वारकर्यांना भजन व कीर्तन करण्यास परवानगी द्यावी 
३) महाराष्ट्रातील देवस्थाने अटी व नियम लावून उघडण्यात यावीत 
४) झी मराठी वरील फु बाई फु या कार्यक्रमात कीर्तन सेवेचा अपमान करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करावेत 
५) लाऊड स्पीकरच्या नियम मंदिर व मशिदीसाठी एकसारखा असावा 
६) इंदोरीकर महाराजांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई