पंढरपूरच्या तहसिलदारांची फेसबुकवर बदनामी

 : सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल



पंढरपूर / प्रतिनिधि


पंढरपूर च्या तहसिलदार वैशाली वाघमारे यांच्याबाबत बदनामी होईल असा मजकूर फेसबुकवरून व्हायरल केल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याच्याविरुद्ध पंढरपूर शहर  पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 



या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून डॉ. वैशाली वाघमारे या कार्यरत आहेत. 15 जुलै 2020 रोजी पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याने कसलाही अधिकार नसताना व कसलीही खातरजमा न करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवरून व्हायरल केली. बदनामी होईल अशा या मजकुराची दखल घेऊन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सागर चव्हाण याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गाडेकर पुढील तपास करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई