उपरी ग्रामस्थांनी हनुमानास घातला दुधाचा अभिषेक...



उपरी ग्रामस्थांनी  हनुमानास घातला दुधाचा अभिषेक...


पंढरपूर / प्रतिनिधि


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्चपासुन राज्यात लाॅकडाऊन सुरु आहे.   याचाच फायदा घेत  खाजगी दुध संस्थानी प्रतिलिटर  केवळ १६ ते १८ रुपये दर देत आहेत. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर दुध बंद आंदोलन पुकारले आहे. 
     या आंदोलनास राज्यभर प्रतिसाद मिळत असुन उपरी ता पंढरपूर येथील ग्रामस्थांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला.   ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिरात दुधाचा अभिषेक घालत अनोखे आंदोलन केले. यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक विलास जगदाळे, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन पै साहेबराव नागणे, माजी तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ आसबे, चंद्रकांत जाधव, सुरेश नागणे, अमुल डेअरीचे चेअरमन शशीकांत मोहिते, सतीश नागणे, राजाभाऊ नागणे, सुधाकर जाधव, सदाशिव मुळे, बबन नागणे, माऊली नागणे, केशव सुरवसे, तानाजी नागणे, रविंद्र नागणे, उमेश नागणे, अनिल नागणे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई