पंढरपूर तालुक्याला कोरोनाचा झटका...!
पुन्हा  वाढले ९ रुग्ण! एक सरपंचही कोरोनाच्या विळख्यात : बाधितांची  संख्या गेली ६४ वर !

पंढरपूर (प्रतिनिधि) : पंढरपुर तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव हॉट असतानाच काल रात्री मोठा झटका बसला असून एकदम ९ रुग्ण पॉझीटीव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यात एकाच कुटुंबातील पाच  तर आणखी  तीन जण  बाधित आहेत. तालुक्यातील एक सरपंचाची कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. 
     पंढरपूर तालुका कोरोनमुक्त राहील असे वाटत असतानाच एका शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे तो पंढरपूर शहरात घुसला आणि तालुकाभर तो आता मुक्तपणे पाय पसरत आहे. काळ  सोमवारी एका दिवसांत तब्बल ९ रुग्णाची भर पडली असून आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. पंढरपूर शहरात ८ तर तालुक्यात १ अशा नव्या ९ रुग्णाची नोंद झाली आहे. शहराच्या महापूर चाळीत एकाच कुटूंबातील पाच जण तर अन्य तिघांनाही  कोरोनाची बाधा झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील एका गावातील सरपंचालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एकंदर परिस्थिती पाहता आता संपूर्ण तालुक्याचीच चिंता वाढीस लागली असून ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिलेले आहे. 
     पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६४ वर पोहोचली आहे. आजचे हे रुग्ण वाढल्याने नागरिकासह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. प्रशासनाने महापूर चाळ परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला असून अन्य उपाययोजना केल्या जात आहेत. शहराच्या विविध भागात पसरणारा कोरोना झोपडपट्टी भागात आक्रमण करीत असल्याने अधिक चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आत्तापर्यंत पंढरपूर शहरात या कोरोनाने दोन बळीही घेतलेले आहेत. नागरिकांनी आता अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीही अनेकजण बेपर्वा दिसत असून तोंडाला मास्क लावण्याचीही तसदी न घेणारे काहीजण दिसत असून त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई