पोलीस चौकीतच लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई


प्रातनिधिक चिञ


  सोलापूर / प्रतिनिधी : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच घेताना सदर बजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर वय 34 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.  धक्कादायक बाब म्हणजे सदर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या रेल्वे टेशन पोलीस चौकीमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ माजली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी परिसरात तक्रारदार व त्यांच्या ओळखीच्या इसमांच्या गाड्या प्रवाशी वाहतुक करणेकरीता उभा असतात. या गाड्यांवर कोणतीही कारवाई न करणेसाठी उपनिरीक्षक प्रशांत श्रीरसागर यांनी मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी करीत १२ हजार स्विकारले. ही लाच रेल्वे पोलीस चौकीमध्येच स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उप अधीक्षक संजीव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रकांत कोळी, शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, शाम‌ सुरवसे‌ यांनी केली.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई