भिमा नदीत तरुण वाहून गेला

 

पिराची कुरोली बंधा-यावर झालेली  गर्दी



पंढरपूर/प्रतिनिधि : पिराची कुरोली ता पंढरपूर येथील बंधा-यावरुन २१ वर्षीय तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सदर तरुणाचा  शोध घेतला जात असल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली. 




 याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी ता पंढरपूर येथील   गजेंद्र उर्फ सज्जन संतोष गायकवाड वय 21  याने बंधा-यावरून नदीमध्ये उडी मारली.  त्या नंतर तेथील ग्रामस्थांनी शोधले असता तो अद्यापर्यंत सापडला नाही. सध्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने शोधण्यास अडथळा येत आहे. सदर तरुणाला शोधणेसाठी पो नि धनंजय जाधव, हवालदार ढोबळे, पोलिस नाईक पठाण, सुरवशे, सय्यद प्रयत्न करीत आहेत.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

आजपासुन दोन दिवस पंढरपूर ला येणारे सर्व बस वाहतुक बंद

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान