पंढरपूरकरांवर चुकीचा विकास आराखडा लादण्याचा प्रयत्न कराल तर उद्रेक होईल :.मनसे नेते दिलीप धोत्रेंचा इशारा

 

 विकासाला विरोध नाही पण जनतेला विश्वासात घ्या...




पंढरपूर शहर प्रस्थावित विकास आराखड्याबाबत विचारविनिमय करणेसाठी रविवारी राञी चौफाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी, व्यापारी, जागरूक नागिरक उपस्थित होते. यावेळी बोलताना  मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की आमचा पंढरपूरच्या विकासाला विरोध नाही, पंढरपूरचा विकास होणे गरजेचे आहे पण यामध्ये जे जे नागरिक बाधित होणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे कसलेही नुकसान होऊ न देता पंढरपूर विकास आराखडा राबविण्यात यावा.


जिल्हाधिकारी  सोलापूर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत मागील महिन्यात काशी विश्वनाथ येथे भेट देत  तेथील विकास कामाची पाहणी केली होती. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापुरात बैठक घेत विकास आराखड्याचे सादरीकरण केले.  वास्तविक ही बैठक पंढरपुरात होणे आवश्यक होते. पंढरपूर शहरातील नागिरकांच्या माहितीसाठी पंढरपुरात बैठक व्हावी अशी मागणी करण्यात आली असता तसे आश्वासनही देण्यात आले. या आराखड्यात प्रास्तवित करण्यात आलेली अनेक कामे येथील जनतेची मते विचारात न घेता थोपण्यात आली आहेत. यामुळे अनेक खोकेधारक, छोटे दुकानदार, मंदिर परिसरातील रहिवाशी, भाजी विक्रेते यांचें भविष्यच उध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. यावेळी बोलताना दिलीप धोत्रे पुढे म्हणाले कि, सोलापुरातील बैठकीत वादग्रस्त प्रस्तावा बाबत काहींनी मौन बाळगले. या आराखड्याबाबत हरकती सूचना दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ ७ दिवसाची मुदत दिली. ही मुदत कमी असून हरकती दाखल करण्यासाठी किमान 15 दिवसाची मुदत देण्यात यावी.   लोकांच्या हरकतीकडे दुर्लक्ष केल्यास शहरात मोठा उद्रेक होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पंढरपूर शहरातील छोटे व्यवसायिक, संभाव्य बाधित रहिवाशी यांना सोबत घेत  पंढरपूर येथील प्रांत कार्यालयात मंगळवारी सामूहिक हरकती दाखल करणार असल्याचे सांगितले.  

यावेळी  विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके बोलताना म्हणाले पंढरपूर शहरातील नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही तुमची एकही वीट हलू देणार नाही. अंगावर केसेस झाल्या तरी हरकत नाही पण कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, यासाठी  जनआंदोलन करण्यात येईल.

 यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी ,शिवसेनेचे  शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश नाना साठे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय घोडके, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश भादुले, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कवडे, मनसे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर, हिंदू महासभेचे विवेक बेणारे, अभयशिंह इचगावकर, पत्रकार महेश खिस्ते, बाळासाहेब डिंगरे, भाजपचे काशीनाथ थिटे, बाबा बडवे, शिरीष कटेकर, नगरसेवक मोहम्मद उस्ताद, सतीश अप्पा शिंदे, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, सुमित शिंदे, दत्ता काळे, महेश पवार, महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष साधनाताई राऊत ,व्यापारी आघाडीचे कौस्तुभ गुंडेवार, माऊली गांडूळे, शहाजी शिंदे इत्यादी उपस्तीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई