सामाईक झाड तोडून केला खून : आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

 


 पंढरपूर न्यायालयाचा निकाल





 पंढरपूर / प्रतिनिधी :  सामाईक चिलारीचे झाड तोडताना झालेल्या वादात आरोपींनी कुऱ्हाडीने घाव घालून मयत महिला विमल शंकर पवार यांचा खून केला होता.  तर त्यांचा मुलगा शरद पवार यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  याप्रकरणी पंढरपूर सत्र न्यायाधीश महेश लंबे यांनी आरोपी महेश मारुती पवार यास दोषी धरून त्याच्या उर्वरित जिवनाच्या नैसर्गिक अंतापावेतो आजन्म सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 


 याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील शेरे वस्ती येथे दिनांक 26 मार्च 2017 रोजी सकाळी आठ वाजता आरोपी महेश पवार त्याचे वडील मारुती पवार, आई कुसुम पवार यांना चिलारीचे  झाड का तोडता असे विचारल्यावर मयत विमल पवार व त्यांचा मुलगा शरद पवार यास मारहाण केली होती.  या मारहाणीत विमल यांचा मृत्यू झाल्याने सांगोला पोलीस ठाण्यास भादवी कलम 302 307 337 201 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तत्कालीन तपास अधिकारी सपोनि भाऊराव बिराजदार यांनी आरोपी विरोधात दोषारोपञ  दाखल केले होते.  न्यायालयात सुनावणी दरम्यान 11 साक्षीदार तपासण्यात आले होते यानुसार पंढरपूर न्यायालयाने 22 एप्रिल 2021 रोजी यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली होती. यावेळी आरोपी महेश पवार यास आजन्म कारावासाची शिक्षा तर आरोपी मारुती पवार व कुसुम पवार यांना कलम 337 मध्ये दोषी धरून पाचशे रुपये दंडाची शिक्षा तत्कालीन पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी सुनावली होती.  मात्र यातील आरोपी महेश पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात  वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उलट तपास घेतला नाही, बचावाचे साक्षीदार तपासण्याचे संधी दिली नाही या मुद्द्यावर अपील दाखल केले होते. यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी यांचा उलट तपास घेऊन बचाव साक्षीदार तपासण्याची संधी देऊन सदर प्रकरणाचा 60 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश पंढरपुर न्यायालसास दिले होते.  यानुसार या प्रकरणाची पंढरपूर सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली.  यावेळी आरोपीतर्फे डॉक्टर गणेश कुमार सातपुते यांचा उलट तपास घेण्यात आला तर बचावाचा साक्षीदार  घेण्याचे नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.  दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी महेश मारुती पवार यास भादवी कलम 302 307 506 201 मध्ये दोषी धरले.  कलम 302 करता आजन्म सक्षम कारावास व दहा हजार रुपये दंड, कलम 307 करता सात वर्ष सक्षम कारावास व 7500 दंड, भादवी कलम  506 करता दोन वर्ष सक्षम कारावास व पंधराशे रुपये दंड, भादवी कलम 201 करता एक वर्ष सक्षम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  सदरच्या सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याच्या असून दंडाच्या रकमेपैकी 20000 रुपये मयत विमल शंकर पवार हिच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश पंढरपूरचे सत्र न्यायाधीश महेश लंबे यांनी दिला.  या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एडवोकेट सारंग वांगीकर, एडवोकेट आनंद कुर्डुकर   कोर्ट पैरवी म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू माने यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई