अवैध धंद्यावर पोलीसांची कारवाई ; १ लाख ८३ हजारांची दारु जप्त

 

अवैध दारुसह ताब्यात घेतलेला आरोपी, पो नि धनंजय जाधव व पंढरपूर ग्रामीण पोलीस कर्मचारी


          पंढरपूर/प्रतिनिधी : पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ शत्रुघ्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला याने तिसंगी येथील  अजिंक्यतारा हॉटेलमध्ये व हॉटेलचे पाठीमागे असलेल्या शेवाळे यांचे घरातील खोलीमध्ये अवैद्य देशी - विदेशी दारुचा साठ्यावर पोलीसांनी कारवाई केली.  यामध्ये १ लाख ८३ हजारांची दारु जप्त केल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली. 

याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, किंगफिशर बिअर, टुबर्ग बिअर, देशी दारु संत्रा, इंपिरीअल ब्यु, मँकडॉल नंबर 1 व्हीस्की, मँक़डॉल नंबर 1 रम, व्हाईटमिस्चिफ वोडका, ब्लेडर प्राईड व्हीस्की, ब्लँक डिलक्स. व्हीस्की, रँयल स्टँग व्हीक्सी, रोमानो वोडका, आँफिसर चॉईस व्हीस्की, डॉ.श्रीपुर ब्राँन्डी व्हीस्की आदी  1 लाख 83 हजार 780 रुपयांची अवैध दारु पोलीसांनी जप्त केली.  आरोपी बंडु भारत पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला यास ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेलचे मालक नवनाथ शत्रुग्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला जि. सोलापूर याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. बेकायदा बिगरपास परमिटने  1 लाख 83 हजार 780 रुपयाच्या वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आले म्हणुन त्याचे विरुध्द पंढऱपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 415/2022 महाराष्ट्र दारुबंदी अधिनयम 1949 चे कलम 65(ई), 68  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


  

सदरची कामगीरी  पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, याचे मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय जाधव,  पोसई तुळशिराम शिंदे, सपोफौ तैबुद्दीन मुंडे, आप्पासाहेब कर्चे, शहाजी मोटे, संतोष जगताप, पोहेकॉ सुभाष शेंडगे, पोहेकॉ सुनिल जाधव, पोना अमर सुरवसे, पोना रविंद्र बाबर, पोना गणेश इंगोले, पोना जावेद पठाण, पोकॉ रशिद मुलाणी, मपोहेकॉ मोनिका वाघे, मपोकॉ दिपाली इंगोले, चापोना राहुल शिंदे यांनी केली.  सदर गुन्ह्याचा तपास पोसई दिलीप शिंदे करीत आहेत. अवैद्य दारु विक्रत्यांना कठोर कारवाईचा ईशारा पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई