माजी महापौर मनोहर सपाटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

 


सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर मनोहर गणपत सपाटे वय 71 यांना पिडीत महिलेवर अनेक वर्षापासून अत्याचार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात अतिरिक्त सञ न्यायाधीश श्रीमती के.डी.शिरभाते यांनी अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर केला. 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिडीत महिलेवर मनोहर सपाटे यांनी शारिरीक संबध ठेवले, तिने विरोध केल्यानंतर तुला कामावरुन काढून टाकीन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन असे धमकावत तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. तिची इच्छा नसतानाही तिचा राजीनामा घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले. अशा आशयाची फिर्याद पिडीतेने फौजदार चावडी पोलीसात दाखल केली होती. सदर सोलापुर सञ न्यायालयामध्ये मनोहर सपाटे यांनी अँड शशी कुलकर्णी यांच्यामार्फत अटकपुर्व जामीन अर्ज  दाखल केला होता. सदर प्रकरणाची सुनावणी अति.सञ न्यायाधीश श्रीमती के.डी.शिरभाते यांच्या समोर झाली.  सदरकामी अँड शशी कुलकर्णी  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन पोलीस स्टेशन येथे हजेरी लावण्याच्या अटीवर अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणी आरोपीतर्फे अँड शशी कुलकर्णी, अँड गुरुदत्त बोरगावकर,अँड देवदत्त बोरगावकर,अँड विश्वास शिंदे, अँड बाबासाहेब सपाटे तर मुळ फिर्यादीतर्फे अँड भडंगे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई