लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपुर तालुक्यात पशुसंवर्धन विभाग सज्ज : प्रांताधिकारी गजानन गुरव

 

तत्काळ उपचारासाठी  10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथक



        पंढरपूर :- लम्पी त्वचा आजार  हा गाई आणि म्हैस यासारख्या जनावरांमध्ये आढळून येत असून, हा आजार संसर्गजन्य असल्याने तो एका कडून दुसऱ्या जनावरांना होत आहे. तालुक्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभाग सज्ज असून, जनावरांच्या तत्काळ उपचारासाठी 10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये कोणतेही आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे असे, आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे

पंढरपूर तालुक्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.भिंगारे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पी.एम.जाधव, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात  जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे असणारी जनावरे आढळून आली असून, पंढरपूर तालुक्यात या आजाराची लक्षणे असणारी जनावरे आढळून आली नाहीत. मात्र लम्पी त्वचा आजार संसर्गजन्य असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासन सज्ज असून, पशुपालकांनीही सतर्क राहून जनावरांची आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले. 

     पंढरपूर तालुक्यात सध्या  90 हजार गाई व 85 हजार म्हैसी  असून, तालुक्यात या आजाराची लक्षणे असणारी जनावरे आढळून आली नाहीत. लम्पी त्वचारोग हा केवळ गाई व म्हैस या जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे लंपी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावरांना लम्पी त्वचा रोगाच्या संसर्गापासून वाचवता येईल असे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.एस.एस.भिंगारे यांनी सांगितले.

निरोगी जनावरांना आजार होऊ नये म्हणून आजारी जनावरांना स्वतंत्र्य ठेवण्यात यावे. गोठ्याची वेळोवेळी स्वच्छता करुन,जंतनाशक फवारणी करावी. जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.आजाराची लक्षणे आढळ्यास तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. पशुपालकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असेही डॉ.भिंगारे यांनी सांगितले.  

                                                                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई