भंडीशेगाव येथे चोरी : पोलीस पथके तैनात
पंढरपूर : भंडीशेगाव ता पंढरपुर येथील वासुदकर वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी चार तोळे सोन्यासह रोख ७० हजारांची चोरी केली आहे. याबाबत बाळासाहेब सांळुखे यांनी गुन्हा दाखल केला असून चोरांच्या तपासासाठी पथके तैनात केल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, 10 जानेवारी रोजी रात्री 11/30 वा सुमारास साळुंखे यांचे कुंटुबीय घरातील सर्व खोल्यांचे दरवाजांना कडया न लावता नुसते पुढे करून झोपले होते. पहाटे 5 वा चे सुमारास नेहमी प्रमाणे सकाळी काम करण्यासाठी उठले असता घरासमोरील पोर्चमध्ये लहान मुलीचे खोटे गळ्यातील पडलेले दिसले. यानंतर घरातील खोलीकडे पाहिले असता चोरी झालेचे समजले. घरातील चार तोळे सोने व चांदीचे पैजन व रोख 70 हजार असे एकुण 2 लाख 74 हजार 500 रुपयांची चोरी झाली आहे. घटनास्थळी पो नि धनंजय जाधव यांनी भेट देवून तपासासाठी पथके तैनात केली आहेत.
%20(11).jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा