सोशल मीडियावर अनोळख्या व्यक्तीसोबत संपर्क टाळा- सहा. पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात




पंढरपूर :  २ जानेवारी  ते ०७ जानेवारी २०२३ या दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे.  यानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने २ जानेवारी पासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.  पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे,  अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,   उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,  पो नि  मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  



अनवली येथील सतु कृष्णाकेनी विद्यालय  येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक, वापर करताना घ्यावयाची दक्षता, आपली वैयक्तिक व खाजगी माहिती आवश्यकता नसल्यास शेअर करू नये. सोशल मीडिया वरून देण्यात येणारे वेगवेगळे आमिषे यांना बळी पडू नये. सोशल मीडियाच्या बाबतीत सजगता हाच सुरक्षेचा उपाय असल्याचे यावेळी विद्यार्थ्याना सांगण्यात आले. गुड टच व बॅड टच याबाबत माहिती सांगितली. महिला व विद्यार्थीनी कोणत्याही व्यक्ती छेडछाड करीत असेल तर निर्भया पथकाला अथवा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याबाबत आवाहन केले. वाहतूक शाखेकडील पोलीस अंमलदार नरळे व जगताप यांनी पंढरपुर - मंगळवेढा रोड वर वाहतूक नियमाबाबत प्रात्यक्षिक दाखवले.  वाहतूक नियम व चिन्ह याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यपक डोईफोडे सर,  करणावर सर, सूर्यवंशी सर, शिंदे सर, डामसे सर पोलीस नाईक माळी, नरळे, पोकॉ जगताप व पोलीस पाटील तोफिक शेख उपस्थित होते



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई