पांडुरंगाचा प्रसाद मिळणार घरपोच

 


पांडुरंगाचा प्रसाद

आता पोहोचणार घरी

पंढरपूर : गेल्या नऊ महिन्यापासून भाविक विठूमाऊलीच्या दर्शनापासून वंचित तर आहेतच पण त्याच्या प्रसादापासूनही भाविक  दुरावला आहे, भाविकांसाठी या प्रसादाचं महत्व अनन्यसाधारण असून यापुढे भाविकांना घरपोहोच प्रसाद मिळणार आहे. 

  पंढरीत आलेला सर्वसामान्य भाविक विठूमाऊलीचे दर्शन घेतो आणि परतताना पांडुरंगाचा प्रसाद घेऊनच पंढरीचा निरोप घेत असतो. गेल्या नऊ महिन्यापासून भक्तांचा पांडुरंगच बंद दाराआड राहिल्याने वारकरीही पंढरीला येऊ शकला नाही आणि त्याला प्रसादापासूनही वंचित राहावे लागले आहे. पंढरीला येऊ न शकलेले भाविक हा प्रसाद घेताच पंढरीची वारी घडल्याचं  समाधान मानतात. या भाविकांना गेल्या नऊ महिन्यापासून हा प्रसाद मिळाला नाही आणि मंदिर उघडले असले तरी दर्शनाच्या मर्यादा असल्याने आणखी किती काळ लागेल हे देखील अंदाजाच्या पलीकडे आहे. 

पांडुरंगाच्या प्रसादापासून दूर असलेल्या भाविकांना घरपोहोच प्रसाद देण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीने एक कौतुकास्पद नियोजन केले असून देशभरातील भाविकांना प्रसाद घरपोच करण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीने 'पंढरी प्रसाद डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली असून आजच विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ज्योतिषाचार्य ह भ प अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे अनावरण झाले. पंढरपुरातील प्रमुख प्रासादिक वस्तूंच्या उद्योजकांनी एकत्रित येऊन ही संकल्पना राबवली आहे. या वेबसाइट अनावरण प्रसंगी मेवरिक डेव्हलपर्सचे शैलेश खरात, अनिरुद्ध बडवे,  विनायक हरिदास, अजय जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते

 पांडुरंगाच्या प्रसाद प्रत्येकाला घरपोच मिळावा यासाठी सेवा समितीने ही योजना सुरू केली आहे . Www.pandhariprasad.com या वेबसाईटच्या माध्यमातून आता भाविक ऑनलाईन शुल्क भरून कुरियर द्वारे पंढरीचा प्रसाद आणि अनेक प्रासादिक वस्तू आपल्या घरपोच मागवू शकतात.  त्यामध्ये कुंकू  , बुक्का ,  तुळशीच्या माळा ,  लाडू प्रसाद,  पेढे ,  अगरबत्ती,  चंदनी खोड - सहान , टाळ ,  श्री विठ्ठलाच्या सर्व प्रकारची मूर्ती,  फोटोफ्रेम , सोवळे (कद) , उपरणे अशा अनेक प्रासादिक समावेश आहे .



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान

अखेर कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांच्या अर्जावरील निकाल जाहीर

चक्क गोव्याची दारु वाखरीत......