पंढरपूर - कुर्डुवाडी महामार्गावर अपघात... एक ठार


रोपळे येथे अपघात... चालकाचा जागीच मृत्यू...

पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर - कुर्डुवाडी मार्गावरील रोपळे येथे ट्रक व ऊस वाहतुक टॅक्टरचा समोरासमोर अपघात झाला.  या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यु झाला असल्याची माहिती तालुका पो नि किरण अवचर यांनी दिली.  हा अपघात रविवारी पहाटे ३:३० वाजणेचे सुमारास घडला.  पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत. 
      
सध्या या महामार्गावरील अनेक ठिकाणी ठेकेदाराने पुल व साईटपट्टयांची कामे अर्धवट ठेवली आहेत.  यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमधुन होत आहे. मागील रविवारी दि २५ आक्टोबर रोजी देखील आढीव विसावा या ठिकाणी खराब रस्त्यामुळे ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला होता. याकडे माञ संबधित ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

आजपासुन दोन दिवस पंढरपूर ला येणारे सर्व बस वाहतुक बंद

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान