कंन्टेनरच्या धडकेत तुंगतच्या दोन तरुणांचा मृत्यू


बाळे येथील घटना 

पंढरपूर / प्रतिनिधि : कारचे टायर पंम्चर झालेने  टायर खोलत असताना पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या कंन्टेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये  सारंग प्रकाश रणदिवे (तुंगत ता पंढरपूर), संजय विठोबा अमंगे (रा. मानेवाडी ता. मंगळवेढा हल्ली  तुंगत)  या तरुणांचा मृत्यु झाला. 
    सोलापुर - पुणे महामार्गावरील बाळे येथील सुयोग हाॅटेलजवळ हा भीषण अपघात रविवारी राञी १०.३० वा.    झाला. एम एच १३ एझेड ७२३४ या कारने हे तरुण लातुरहून तुंगत असा प्रवास करीत होते. कार पंम्चर झालेने टायर खोलत असताना ट्रक नं सीजी ०४ एमपी १४५७ ने धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पळुन गेला असुन पोलीसांनी ट्रक‌ ताब्यात घेतला आहे. अधिक तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई