चुलत्याचे सराफ दुकान फोडुन पुतण्याच्या मोटारसायकवरुन चोरट्याने ठोकली धुम....

 

उपरी येथील प्रकार : चोरटे सीसीटिव्ही कॅमे-यात कैद...


पंढरपूर / प्रतिनिधि :  उपरी ता. पंढरपूर येथे बुधवारी राञी अज्ञात चोरट्याने  सराफ दुकानाचे शटर उघडत चांदिचे दागिने लंपास केले. जाताना मोटारसायकलसह सीसीटिव्ही कॅमेराचे डिव्हिआर  घेवुन पोबारा केला. उपरी येथील नवनाथ नागणे यांच्या स्वामी समर्थ ज्वेलर्स चे शटर उघडुन चांदिचे दागिने लंपास केले. या दुकानातील सीसीटिव्ही कॅमेराचे डिव्हिआर देखील चोरट्यांनी लंपास केला आहे. जाताना  या सराफ दुकानदाराचे  पुतणे सोमनाथ नागणे यांची मोटारसायकल क्र  एम एम १३ सीजी ४९९८  याची देखील चोरी करण्यात आली. माञ  पेट्रोल संपल्याने दफनभुमी जवळ मोटारसायकल सोडुन चोरट्यांनी पोबारा केला.  ही घटना राञी तीन वाजणेच्या सुमारास घडली.



 सराफ दुकानाची चोरी करणेचे अगोदर या चोरट्यांनी गावातीलच संस्कृती बिअरबार व परमिट रुमचे कुलुप तोडले. याठिकाणी असलेल्या सीसीटिव्हि कॅमेरा फिरवत चोरी करण्याचा प्रयत्न केला. माञ याठिकाणी ढाबा मालक व कामगार मुक्कामी असलेने त्यांना चोरी करता आली नाही.पो नि प्रशांत भस्मे, हवालदार मारुती दिवसे, पोहेकाॅ जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  या घटनेचा पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई