सोलापूर तालुका पोलीसांनी केले रॅपिड टेस्ट तपासणीचे शिबीर




सोलापूर :  दैनंदिन कामकाजाकरीता  सामान्य लोकांसोबत नेहमी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे संपर्क येत असतो. ल पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्ठीने  सोलापूर तालुका पोलीस स्टेेशनचे पो नि  सुहास जगताप यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता रॅपीड अॅन्टिजन टेस्ट शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 

सदरचे शिबीर  उत्तर सोलापूर चे वैदयकीय अधिकारी एस.पी. कुलकर्णी यांच्या मदतीने करण्यात आले होते.  सदर शिबीरामध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, तसेच सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण येथील अधिकारी व पोलीस अंमलदाराची असे एकुण 53  रॅपिड एॅटीजन तपासणी व 15 आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली.   सदर तपासणीमध्ये कोणीही अधिकारी व अंमलदार हे कोव्हीड 19 पाॅझीटीव्ह आढळुन आले नाहीत. 
सदरचे शिबीर हे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,  आरोग्य अधिकारी  डाॅ. शितलकुमार जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक  अतुल झेंडे,        
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर तालुका पोलीस निरीक्षक सुहास जगताप, वैदयकीय अधिकारी उत्तर सोलापूर एस.पी.कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये मार्डी ता. उत्तर सोलापूर येथील वैदयकीय अधीकारी डाॅ. सागर मंगेटकर व त्यांच्या पथकातील कर्मचा-यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई