चैन्नई येथे गोळीबार करुन खून करणारे आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केले जेरबंद

 

सिनेस्टाईल पाठलाग करीत रिव्हाॅल्वरसह तीन आरोपींना पकडले



पंढरपूर / प्रतिनिधि :  तामीळनाडू राज्यातील चेन्नई येथे गोळीबार करीत खून करणारे आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले.  आपले हद्दीत अथवा आपले राज्यात गुन्हा दाखल नसतानाही पळून जाणारे आरोपींना जेरबंद केलेमुळे सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या कामगिरीची कौतुक होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  तामीळनाडू राज्यातील चेन्नई येथील एलिफंट गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैशाच्या कारणांवरुन गोळीबार करीत आरोपींनी खून केला. खून करून सदरचे आरोपी हे    लाल रंगाच्या व्हाॅल्सवेगन कारने हैद्राबाद - सोलापूर रोडने पुणेच्या दिशेने फरार झालेची माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली.  घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी  जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्याचे आदेश सर्व पोलीस निरीक्षकांना दिले.  याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा व सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी - कर्मचा-यांना योग्य सुचना देत हैद्राबादच्या दिशेने रवाना केले.  संशयित कार ही बोरामणी गावाच्या हद्दीत दिसताच पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला.  सिनेस्टाईलने बोरामणी ते मुळेगाव तांड्यापर्यंत पाठलाग करताच आरोपिंनी सदरची गाडी पुन्हा हैदराबादच्या दिशेने जावू लागले. यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी शासकीय वाहने अडवी लावत  मुळेगाव तांड्याजवळ युपी १६ एएच ८३४९ या कारसह तीन आरोपींना पकडले. याचबरोबर तामीळनाडू राज्यातील चेन्नई येथील एलिफंट गेट पोलीस स्टेशन गुरनं ‌९१६/२०२० भादवि कलम ३०२, ३४ आर्म अॅक्ट ३,२७ गुन्ह्यातील वापरलेले रिव्हाॅल्वर व तीन जिवंत काडतुसे, कारसह आरोपींना  चैन्नई येथील कामीशेड पोलीस स्टेनचे पो नि बी. पी. जवाहर यांच्या ताब्यात दिले. 

    सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अरुण सावंत, सोलापूर तालुका  पो नि सुहास जगताप, पोहेका संजय देवकर, प्रकाश क्षिरसागर, अनिस शेख, राहुल कोरे, शशी कोळेकर, बसवराज अष्टगी, कदम, मोहन मोटे, सचिन वाकडे, श्रीकांत गायकवाड, परशुराम शिंदे, लालसिंग राठोड, रामनाथ बोंबिलदार,  अन्वय आतार आदिंनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई