सामान्य माणसांना 'आपला' वाटणारा नेता गेला !

 


नाना गेले !

 

 पंढरपूर : गेल्या काही दिवसापासून असलेली भीती अखेर काल रात्री प्रत्यक्षात उतरली असून तालुक्याचे उमदे आणि रांगडे नेतृत्व आमदार भारत भालके यांचे निधन झाले असून पंढरपूर तालुक्याला हा जबर धक्का बसला आहे. 

 आमदार भालके यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर होते.आमदार भारत भालके हे गेल्या आठ  दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार घेत होते. काल त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि रात्री त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री भरणे हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.आमदार  भारत भालके यांना कोरोनाची बाधा  झाली होती. त्यातून बरे होऊन ते परत आलेही होते परंतु पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली.  त्यांच्या जाण्याने 

पंढरपूर तालुक्याला जबर धक्का बसला असून राजकारणातही  पोकळी निर्माण झाली आहे
  लोकप्रिय असलेल्या या नेत्याने तांबड्या मातीनानंतर राजकारणाच्या मैदानात मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने डाव टाकत अनेक कुस्त्या जिंकल्या होत्या पण ही कुस्ती या रांगड्या पहिलवानाला नाही जिंकता आली. आक्रमक आणि कणखर नेता म्हणून त्यांची ओळख होती. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून जनतेतून निवडून आले होते आणि साद्य ते राष्ट्रवादीचे आमदार होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून त्यांनी राजकारणात दमदार पाऊल ठेवले होते. १९९२ साली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे  संचालक ते कारखान्याचे चेअरमन असा प्रवास करीत असतानाच ते आमदार झाले आणि अखेरपर्यंत आमदार राहिले. सन २००९ मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा त्यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव केला. आणि ते प्रथम विधानसभेत पोहोचले.  विठ्ठल  सहकारी साखर कारखाना ते विधानसभा असा त्यांचा आव्हानात्मक पण आत्मविश्वासाने भरलेला प्रवास अखेर काल रात्री थांबला. पंढरपूर तालुक्याला जबर धक्का बसला असून राजकारणातही  पोकळी निर्माण झाली आहे

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई