मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात घोषणाबाजी

जय जिजाऊ.. जय शिवरायच्या घोषणेने शिवाजी चौक परिसर दणाणला....


पंढरपूर / प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा आज काढण्यात  येणार आहे. यासाठी मराठा समाज बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे.  


     शिवाजी चौकात जमलेल्या मराठा समाज बांधवांनी जय जिजाऊ... जय शिवराय... एक मराठा ... लाख मराठा  अशा घोषणा देवुन परिसर दणाणुन सोडला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ३१ सपोनी/ उपनिरीक्षक ५०० पोलीस कर्मचारी, एक एस आरफ तुकडी असा बंदोबस्त तैनात केलेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. 
कोरानाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मंदिर परिसरात संचारबंदी व शहरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तरीही  आंदोलक आंदोलन करण्यास ठाम आहेत. यामुळे या आंदोलकाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई