कान्हापुरीच्या सरपंचपदी प्रेम चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र शिंदे बिनविरोध


पंढरपूर/प्रतिनिधि: कान्हापुरी ता.पंढरपूर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रेम रघुनाथ चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.महामुनी, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब यांनी काम पाहिले. 
     पंढरपूर तालुक्यात लक्ष लागुन राहिलेल्या कान्हापुरी ग्रामपंचायत मध्ये मतदारांनी जुन्या पुढार्याना डावलुन युवा पिढीकडे मतदान रूपी सत्ता हातात दिली.सरपंचपदी युवक नेते प्रेम चव्हाण यांची निवड झाल्याने ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल दयानंद शिंदे, राणी दिपक फराडे, गोकुळ गिरआप्पा पाटील, मैहबुब रसुल देशमुख यांचेसह माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव शिंदे, माजी सरपंच रघुनाथ चव्हाण, गणपत फराडे, कुमार शिंदे, कासम देशमुख, युवराज चव्हाण, अनिल पवार, नितिन चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, महादेव मुंडफुणे, महादेव कारंडे, ईश्वर काळेल, रमेश शिंदे, ईश्वर शिंदे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी नुतन सरपंच, उपसरपंच, नुतन सदस्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचा करण्यात आला. 
    नुतन सरपंच, उपसरपंच यांचे आ.बबनदादा शिंदे,  आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे, सभापती विक्रम दादा शिंदे, माढा वेलफेअर फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे, निमगाव टें चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांनी अभिनंदन केले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई