पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण नव्याने काढण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश



पाच गावातील नागरिकांनी चुकीच्या  आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात घेतली होती धाव

पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण  २७ जानेवारी रोजी काढणेत आले होते. या चुकिच्या आरक्षणाबाबत तालुक्यातील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली,  गावातील नागरिकांनी अॅड विजय जाधव यांचे वतीने  मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आरक्षण बदलण्याची मागणी केली होती. यावर जिल्हाधिका-यांनी सुनावणी घेणेचे आदेश न्यायालयाने दिले होते. 
   सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सुनावणी पुर्ण केली. सुनावणी दरम्यान देखील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली चे आरक्षण बदलण्याचा युक्तिवाद अॅड विजय जाधव यांनी केला.  जिल्हाधिकारी यांनी    पंढरपूर तालुक्यातील अनुसुचित जमाती व अनुसुचित जमाती महिलेसाठी काढणेत आलेले आरक्षण कायम‌ केले आहे. माञ अनुसुचित जाती, ना.मा. प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने आरक्षण काढणेचा आदेश दिला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील आरक्षण बदलणार असुन दि २२ फेब्रुवारी रोजी नव्याने आरक्षण काढणेत येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई