मायक्रो फायनान्सच्या तगाद्यामुळेच सुनेची आत्महत्या....

 

 

सासू सुनीता निकम यांचा आरोप.... 

निराधार झालेल्या आजी  -  नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतला पुढाकार


पंढरपूर:  प्रतिनिधी : सध्या महिलांना बचतगट हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.त्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे  आपल्या सहकाऱ्यांसह  प्रयत्न करीत आहेत. अशातच पंढरपूर मधील डाळे गल्ली येथील मनीषा अभय निकम या विधवा तरुण महिलेने मागील काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती आत्महत्या केवळ महिला बचत गट वसुली वाले यांनी वसुलीसाठी दिलेल्या त्रासामुळेच झाली असल्याची कबुली आज मयत महिलेची सासू सुनीता अरुण निकम यांनी पत्रकार समोर दिली असल्याने महिला मधून संताप व्यक्त केला जात आहे.

    या घटनेमुळे निकम यांच्या घरातील छोटी मुलगी आणि सासू निराधार झाली आहेत.या निराधार आजी नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला असून त्या दोघींना दत्तक घेऊन त्यांच्या सर्व आर्थिक खर्चाची जबाबदारी दिलीप धोत्रे यांनी पत्रकार समोर स्वीकारली आहे.


यापुढील घटना टाळण्यासाठी आता बचतगट कार्यालयाला टाळे ठोकण्याचा मनसेचा निर्धार  :  दिलीप धोत्रे

सध्या महिलांना त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही मनसे ने मागील चार पाच महिन्यापासून धीर देण्याचे काम चालू केले आहे.तरीही काही मस्तवाल लोक महिलांना घरी जाऊन त्रास देत आहेत.यामुळे आशा घटना घडू लागल्या आहेत. यासाठी महिलांच्या पाठीशी मनसे असल्यामुळे आशा प्रकारे कृत्य करून आपल्या कुटुंबाला पोरके करूं नये.जर कोणी त्रास देत असतील तर त्वरित कळवा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू अस असे आवाहन दिलीप धोत्रे यांनी केले आहे.याबाबत राज ठाकरे यांना सविस्तरपणे चर्चा करून बचतगट वाल्यांचा कायमचाच बंदोबस्त करून हे कर्ज माफी होण्यासाठी आम्हाला आंदोलन उभा करावे लागणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई