जुना राग झाला अनावर आणि हातात घेतला कोयता !


'तो' म्हणाला, आज नाही सोडत !

आणि त्याने मारून टाकलेही!

पंढरपूर : 'तो' त्यांच्या घरी गेला आणि म्हणाला, 'तुला आज सोडत नाही', ..... काही वेळाने त्याने त्यांना पुन्हा गाठले आणि ' आज तुला जित्ता ठेवत नाही' असं  म्हणत त्याने खरोखरच कोयत्याने वार करायला सुरवात केली आणि काही क्षणात त्याना मारूनही टाकले!
  पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथे सुरु झालेली ही घटना घडली देगावच्या शिवारात, चार वर्षांपासून मनात धरलेल्या रागाने एकाच जीव गेला पण याचे  मात्र तुरुंगाची हवा खायचे दिवस सुरु झाले. पंढरपूर तालुक्यातील बाभुळगावचे सतीश उर्फ बाळू हरी पवार, त्याचे वडील  आणि लाला बबन शिंदे यांच्यात जुने वैमनस्य होते त्यातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळूचे आईवडील त्यांच्या शेतातील घरी असताना आरोपी लाला बबन शिंदे तेथे आला. सन २०१६ मध्ये दिलेल्या तक्रारीवरून भांडणाला सुरुवात केली आणि सतीश उर्फ बाळू पवार यांच्या वडिलांना ' हऱ्या, आज तुला ठेवत नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत सतीशला दगड फेकून मारले. फिर्यादी सतीश याच्या उजव्या खांद्यावर आणि पोटावर यामुळे जखम झाली.
  सदर घटना घडल्यानंतर सतीश उर्फ बाळू आणि त्याचे वडील हरी पवार हे पोलिसात तक्रार करण्यासाठी मोटार सायकलवरून पंढरपूरकडे निघाले. आरोपी लाला बबन शिंदे यांनी हरी पवार याना जिवंत ठेवायचेच नाही असा चंग बांधलेला असावा असे दिसते. पोलिसात तक्रार देण्यास निघालेल्या सतीश आणि त्याच्या वडिलांस लाला शिंदे याने देगाव हद्दीत गणेश गांडूळे यांच्या शेताजवळ मोटार सायकल आडवी घालून रोखले. कोयता हातात घेत ' हऱ्या, तुला आत्ता जित्ता सोडत नाही' असे म्हणत हरी पवार यांच्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. लाथांनीही मारहाण केली. सतीश पवार यांच्यावरही कोयत्याने वार करून त्यालाही ठार करण्याचा प्रयत्न केला. यात सतीश पवार हा जखमी झाला परंतु त्याचे वडील हरी पवार मात्र या हल्ल्यात ठार झाले. 
   सदर प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लाला शिंदे याला लगेच ताब्यात घेण्यात आले . या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे करीत आहेत.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई