आयपीएस निखील पिंगळे लातुरचे पोलीस अधिक्षक..
सोलापुरचे मनोज पाटील यांची अहमदनगरला बदली
पंढरपूर / प्रतिनिधि : शासनाने गुरुवारी राज्यातील काही पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सोलापूरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर पोलीस अधिक्षक म्हणुन बदली केली आहे. तर पंढरपूरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांची लातुर पोलीस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे. ते सध्या समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट १३ नागपुर येथे कार्यरत आहेत. सोलापुरच्या जिल्हा पोलीस प्रमुख पदी शासनाने अद्याप कोणाची नियुक्ती केली नसुन नवीन पोलीस अधिक्षकपदी कोणाची नियुक्त होणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी अपर पोलिस अधीक्षक म्हणूनही सोलापुरात काम केले होते. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोरी, घरफोडी यावर नियंत्रण ठेवले आहे. नागरिकांशी जनसंपर्क वाढवून चांगल्या पद्धतीचे पोलिसिंग केले आहे.तसेच आषाढी वारीचा बंदोबस्तातही चांगले नियोजन केल. सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही विविध उपक्रम राबवले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्यांनी आपल्या कार्यकाळात चांगलाच चाप लावला. जिल्ह्यात टु प्लस मोहिम यांनी सुरु केली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा