पोलीस प्रशासनाने जड वाहतुक केली बंद...



उपरी येथील कासाळ ओढ्याला पूर ...

 पंढरपूर / प्रतिनिधि :   बुधवारी रात्री पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने कासाळ ओढ्याला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे ओढ्याचे नदीत रुपांतर झाल्याचे चिञ सध्या उपरी ता पंढरपूर परिसरात पहावयास मिळत आहे. दरम्यान शिंगोर्णी ता माळशिरस येथून एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे. यामध्ये चालक बेपत्ता झाला आहे. गेल्या वीस वर्षानंतर या भागात मोठा पाऊस झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन पोलीस प्रशासनाने पंढरपूर - सातारा मार्गावरील जड वाहतुक बंद केली आहे. 
 मुसळधार पावसामुळे कासाळ ओढ्याला पूर आला असून पूराच्या पाण्यात अनेक पीके वाहून गेली आहेत. ओढ्याकाठचे विजेचे खांब देखील वाहून गेल्याने आठ ते दहा गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान उपरी येथील पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रात्री अचानक परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस,डाळींब,पपई यासह शेती पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील तीन चार दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळे ओढ्यावरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पळशी,सुपली,गार्डी,या गावांचा थेट संपर्क ही तुटला आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये एक चारचाकी गाडीसह दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. वाहून गेलेल्या एकाचा शोध सुरू आहे. प्रशासनाने ओढ्याकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान भीमानदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. पळशी - सुपली गावाला जोडणारे पुलावर तब्बल दहा फुटांपर्यंत पाणी असलेने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. खबरदारी म्हणुन पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजुला बॅरेकेटिंग लावुन रस्ता बंद केला आहे. यावेळी पो नि‌ प्रशांत भस्मे, वाहतुक शाखेचे जावेद तांबोळी, पोलीस हवालदार शेख, पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी, कवले आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई