अपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर !

 

 

 अपघात करून पळाले पण 
काही मिनिटातच अडकले !
 

पंढरपूर : मोटार सायकलला जोराची धडक देऊन त्यांनी अपघात केला, जखमींना मदत करण्याचं नाटकही रंगवलं आणि जखमीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मोठ्या कौशल्याने वेगवेगळ्या दिशेने पळ काढायचा प्रयत्नही केला पण पोलिसांच्या दक्षतेमुळे काही मिनिटातच पोलिसांच्या ताब्यात आले. 

  अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी मोबाईल घेऊन फोटो काढणारे अनेकजण पाहायला मिळतात पण  आपल्याच हातून अपघात होऊनही जखमीला उपचारासाठी नेण्याऐवजी मदतीचे नाटक करून धन्यता मानणारे संवेदनाहिन माणसांचे रूप या अपघातात दिसून आले आहे नवीन सोलापूर मार्गावर पंढरपूर येथे अहिल्या चौकाजवळ ही घटना घडली असून एका पत्रकाराने त्वरित ही माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर याना कळवली आणि त्यानंतर पाठलाग नाट्य सुरु झाले.   पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव  येथील एक मोटारसायकल चालक अहिल्या चौकाकडून पंढरपूरकडे येत होते. अहिल्या चौकाजवळील देवगड मठासमोर MH 11 BV 2233  या स्काॅर्पिओ ने मोटारसायकलीस (MH 13 CH 7286) जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले एक जण जखमी झाला  अपघात झालेनंतर स्काॅर्पिओ गाडीमधील तिघांनी गाडीतुन उतरत मदत करण्याचा देखावा केला. माञ एक जण जागीच मयत झाल्याचे पाहुन स्काॅर्पिओ घेऊन एक जण पळून गेला. इतर दोघांनी काहीवेळ मदतीचा देखावा करत पायी चालत अहिल्या चौकाकडे गेले.  याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार  शिंदे यांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले. याच दरम्यान पळुन गेलेली स्काॅर्पिओ तुंगतचे सरपंच व इतर तरुणांनी तुंगत - सुस्ते रोडवर पकडली आहे. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दुसरा अत्यवस्थ आहे, जखमींवर उपचार सुरु असून पंढरपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई