बॅका व फायनान्सची हप्ते वसुली थांबवा..




पंढरपूर/ प्रतिनिधि :  आज   संपूर्ण देशात कोरोना ने हाहाकार माजवलेला असताना बँका व प्रायव्हेट फायनान्स कंपन्या नी १ सप्टेंबर पासून सक्तीने हफ्ते वसुली सुरू केलेली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत मोरेटरियम ची अंतिम तारीख असताना केंद्र सरकारने व सुप्रीम कोर्टाने यावरती १ सप्टेंबर ला निर्णय देणं अपेक्षित होतं, पण अजूनही तसा कोणताच निर्णय घेतलेला नाही. देशातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना, युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख हा खेळ चालत राहील. RBI व केंद्र सरकारच्या मेंदूला गँगरीन झालाय का ? लोकांचे हफ्ते हे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात असतात. सरकारने व कोर्टाने निर्णय घ्यायला जर १५ दिवस लावले तर सर्वसामान्य लोकांनी या हफ्ते वसुलीला कसं तोंड द्यायचं ? कोरोणा मुळे कुटुंब चालवणं ही अवघड असताना हफ्ते जर भरावे लागणार असतील, तर येत्या महिनाभरात आत्महत्यांचे प्रमाण वाढेल आणि याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असेल. महाराष्ट्र सरकारने या विषयाचा येत्या ४-८ दिवसात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व आम्हाला डिसेंबर पर्यंत moratorium ची मुदत वाढ मिळवून द्यावी, अन्यथा १४ सप्टेंबर पासून आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा जनपरीवर्तन संस्थेचे संस्थापक अक्षय नागणे यांनी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई