पंढरपुर - सातारा व पंढरपूर- पुणे दोन महामार्गावरील वाहतुक ठप्प


पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊस...

उपरी व भंडीशेगाव येथील पुलावर पाणी...


पंढरपूर / प्रतिनिधि : मागील दोन दिवसापासुन पंढरपूर, सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कासाळ ओढ्याचे नदीत रुपांतर झालेचे चिञ सध्या पहावयास मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी देखील उपरी, भंडीशेगाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने उपरी व भंडीशेगाव येथील पुलावर पाणी आले आहे. 
   यामुळे पंढरपूर - सातारा व पंढरपूर फलटण, पंढरपूर - इंदापुर - पुणे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.  या मार्गावरील वाहतुल पोलीस प्रशासनाने बॅरेकेटिंग टाकुन बंद केली आहे.   प्राताधिकारी सचिन ढोले , उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे,  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके हे अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने ओढ्यालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करीत आहेत.  पो नि प्रशांत भस्मे हे उपरी, भंडीशेगाव याठिकाणी थांबुन परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. सातारा - पुणे मार्गावरील वाहतुक बंद केली आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे राञी दहा वाजता उपरी, भंडीशेगाव येथे दाखल झाले असुन दुर्घटना घडु नये यासाठी नागरिकांना व प्रशासनास सुचना देत सतर्क राहण्याचे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई