पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणाचे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांची माहिती

इमेज
  मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन इथापे.                  पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ गणासाठी शनिवार ०७ फेब्रुवारी  रोजी ३०९ मतदान केंद्रावर मतदान पार पडले.  या निवडणूकीत एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची  मतमोजणी सोमवारी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी १०.०० वाजता सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती  निवडणूक निर्णय  अधिकारी तथा उपविभागीय  अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.    पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व पंचायत समितीच्या १६ गणासाठी ६९.४४ टक्के इतके मतदान झाले असून, निवडणूकीत एक लाख ५ हजार ६५७ पुरुष तर  ९२ हजार ८१० स्त्री अशा एकूण  एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच  ६६३ टपाली मतदान झाले आहे. मतमोजणी १६ टेबलवर होणार असून दोन राखीव टेबल ठेवण्यात आले आहे. तर  टपाली मतमोजणी ...