डाॅ सागर कवडें यांचे पंढरपूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी


सलग  १६ महिने पंढरपूर विभागाचा प्रथम क्रमांक

पंढरपूर / प्रतिनिधि : उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी पंढरपुरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तत्कालीन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतुन राबवलेल्या स्पर्धेत पंढरपूर विभागाने सलग १६ महिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  याचबरोबर सर्वांशी समन्वय ठेवत गुन्हेगांरावर कठोर कारवाई केलेमुळे  तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भुषणकुमार उपाध्याय, आयपीएस निखील पिंगळे याप्रमाणे   डाॅ सागर कवडे यांचेही काम कायम पंढरपूरकरांच्या स्मरणात राहणार आहे. 

    १६ आॅगस्ट २०१८ रोजी डाॅ सागर कवडे यांनी पंढरपूरचा पदभार स्विकारला.  यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्या. आषाढी, कार्तिकी याञा व्यवस्थित पार पाडत कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे संकल्पनेतुन पंढरपूरमध्ये युओसी केंद्र उभारले. यामाध्यमातुन भाविकांची सोय करीत सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातुन गर्दीवर नियंञण ठेवले. याचबरोबर महाद्वारामध्ये चार वाॅच टाॅवर उभारले. तिर्थक्षेञ पोलीस संकल्पना राबवत, अवैद्य धंद्यावर कारवाई केली. पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व करकंब या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरीव कामगिरी केली.
 याचबरोबर २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारेंच्या स्मरणार्थ  रक्तदान शिबीर आयोजित केले. यामध्ये जमा झालेले रक्त हे सध्या कोवीडच्या साथीमध्ये पंढरपूरकरांना उपयोगी आले.  आजपर्यंत डाॅ सागर कवडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे केंद्र शासनाने आंतरिक सुरक्षा पदक, राज्य शासनाने विशेष पदक देवुन डाॅ कवडे यांचा गौरव केला आहे. याचबरोबर कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी देखील गौरव केला आहे. पंढरपूरमध्ये त्यांनी चार टोळ्यांवर मोक्का कारवाई केली. 
मार्चपासुन देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासन राञंदिवस मेहनत घेत आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ एकनाथ बोधले यासह सर्वच प्रशासकीय अधिका-यांसमवेत समन्वय ठेवत डाॅ सागर कवडे यांनी कोरोनाच्या संकटात‌ देखील उल्लेखनीय काम केले आहे

बंदोबस्ताचा तगडा अनुभव...

डाॅ सागर कवडे यांना लाखोंच्या संख्येने असलेल्या गर्दीत बंदोबस्तचा तगडा अनुभव आहे. आषाढी - कार्तिकी याञा, गणेशोत्सव, बाबरी मशिद निकाल,  भिमा कोरेगाव याबरोबरच ,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल,  मुख्यमंत्री, गृहमंञी, आदींच्या दौ-यावेळी बंदोबस्त केला आहे. याचबरोबर सन २०१९ मध्ये सांगलीमध्ये आलेल्या पूरामध्ये सलग दहा दिवस थांबुन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई