पंढरपुर - मोहोळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद

 कुंभार घाटाजवळील भिंत कोसळुन ६ जणांचा मृत्यु : शहर व तालुक्यात पावसामुळे जनजिवन विस्कळीत



पंढरपूर / प्रतिनिधि :  मंगळवारी राञीपासुन पंढरपुर शहरासह तालुक्यात सुरु झालेला पाऊस बुधवारी दिवसभर सुरु आहे. तालुक्यातील ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असुन नारायण चिंचोली येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने पंढरपूर - मोहोळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे नागरिकांनी पंढरपूर - रोपळे - शेटफळ या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन तालुका पो नि किरण अवचर यानी केले आहे. या सततच्या पाऊसामुळे भिमा नदी दुथडी भरुन वाहत असुन जुना दगडी पुल पाण्याखाली आहे.  धरण परिक्षेञात पाऊस सुरु असलेने उजनी व वीर धरणातुन २ लाख २५ हजार क्युसॆस पाणी भिना नदी पाञात सोडण्यात  आलेने नदिकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे पंढरपूर ला पाहणी करणेसाठी येत होते. माञ नारायण चिंचोली येथील पुलावर पाणी आलेने ते परत सोलापुरला गेले.


    बुधवारी सायंकाळी पंढरपुरमध्ये ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता.  माञ उजनी व वीर धरणातुन पाणी सोडणेत येणार असलेने पंढरपुरला पुरपरिस्थिती निर्माण होणार आहे.  यामुळे नागरिकांनी सतर्क राहणेचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 सततच्या पावसामुळे कुंभार घाटाजवळील भिंत कोसळुन सहा जणांचा मृत्यु झाला आहे. हि घटना बुधवारी दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास घडली.   तात्काळ प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पावसामुळे भिंतीच्या आडोश्याला बसलेल्या नागरिकांवर हि भिंत कोसळलेने मृत्यु झाला. या दुर्घटनेची चौकशी करीत ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना चार लाख देण्याचे आश्वासन पालकमंञी दत्ताञय भरणे यांनी दिले. उद्या सकाळपर्यंत पाणी पातळीत वाढ होणार असलेने प्रांताधिकारी सचिन ढोले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी नदिकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई