पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व : माञ सुपलीतील सत्ता गमावली

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व : माञ सुपलीतील सत्ता गमावली


पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु झाली आहे. आतापर्यंत चार फे-यांची निकाल जाहिर झाले आहेत. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतीवर आ प्रशांत परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे. माञ मागील पंचवार्षिकमध्ये सुपलीमध्ये परिचारक गटाची सत्ता असतानाही यावेळी एकही उमेदवार विजयी झाला नाही. सुपलीमध्ये आ भालके - काळे गटाचे ९ जागांवर विजय मिळवला आहे. 
   आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पेहे ग्रापंचायत परिचारक ५  आ बबनदादा शिंदे ४, उंबरगाव परिचारक गट ८ अपक्ष १, पोहोरगाव परिचारक ६, भालके - काळे ३, एकलासपुर परिचारक ६, भालके ३, केसकरवाडी परिचारक ६ भालके ३, आंबेचिंचोली परिचारक ६, शैला गोडसे २ अपक्ष १, भटुंबरे परिचारक ६, भालके ३, शेंडगेवाडी परिचारक - काळे ५, अपक्ष २, नळी परिचारक ६, भालके २, तनाळी भालके - परिचारक - काळे आघाडीचे ९ जागांवर विजय. नांदोरे बबनदादा शिंदे - भालके ५,  परिचारक - काळे ४, शिरगाव परिचारक, सांगवी बादलकोट लक्ष्मिनारायण ग्रामविकास आघाडी ६, समविचारी आघाडी ३, शिरढोण ग्रामपंचायतीवर भालके गटाने ९ पैकी ५ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली. वाडीकुरोली येथे कल्याणराव काळे गटाने सर्व ९ जागांवर विजय मिळवत सत्ता राखली.
नेमतगाव - वंचित आघाडी ३, बहुजन आघाडी ४,  सुगाव भोसे भैरवनाथ पॅनेल ३, राजुबापु पाटील गट ३, चिलाईवाडी परिचारक ५, भालके ३, देवडे येथे काळे - भालके - परिचारक गटाची महाविकास आघाडी होती. येथे प्रत्येक गटाचे तीन उमेदवार विजयी झाले. या महाविकास आघाडीच्या विरोधात अपक्षांनी आव्हान उभे केले होते. दोन अपक्षांचा निसरटा पराभव झाला
विटे गावातील प्रभाग एकमध्ये रुक्मिणि पुजारी व इंदुमती पुजारी यांना १४४ अशी समान मते पडली. १ मत नोटाला पडलेने याठिकाणि आरोही अभिजित अहिरे या मुलीच्या नावाने चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये रुक्मिणी पुजारी यांचा विजय झाला. चिंचोली भोसे परिचारक व बबनदादा शिंदे गटाला ४ भालके - काळे गट ३, अनवली सिध्दनाथ जोगेश्वर महाआघाडी ९, सिध्दनाथ जोगेश्वर ग्रामविकास आघाडी २, बोहाळी भालके - काळे ६, परिचारक ५, उजनी वसाहत परिचारक ७  शेगाव दुमाला भालके ७ परिचारक ४ विजयी झाले.  सिध्देवाडी परिचारक गटाने पुर्ण ११ जागांवर विजय मिळवला.

आंबे भालके ७, काळे - परिचारक आघाडी ४, बाभुळगाव परिचारक ८, भालके - काळे २, अपक्ष १, मुंढेवाडी   काळे - परिचारक ७, भालके ४, शेळवे परिचारक ८, भालके - काळे ३, ओझेवाडी भालके - परिचारक आघाडी ४, परिचारक ७, आढीव परिचारक - काळे १०, अपक्ष १, शेवते भालके ८, काळे - परिचारक ३, उंबरे परिचारक ८, कोरके ३, खेडभाळवणी भालके - परिचारक आघाडी ५, विठ्ठल परिवार ४, तारापुर  महाडिक - परिचारक १०, काळे १, करोळे  भालके -  काळे ११, कान्हापुरी परिचारक - शिंदे ६, भालके ३,  तावशी  परिचारक - भालके ११, आवताडे - परिचारक आघाडी २, देगाव सर्वपक्षीय ५, सरकोली भालके ९, परिचारक २, काळे २, रयत संघटना १, पटवर्धन कुरोली काळे - भालके ७, परिचारक २, तिसरी आघाडी २, कौठाळी परिचारक ७, भालके ३, अजनसोंड परिचारक ५, बबनदादा शिंदे - भालके ४, रांझणी‌ भालके - परिचारक ६, भालके ५, सुस्ते आघाडी ८, परिचारक ५, तपकिरी शेटफळ भालके ७, परिचारक ३, आवताडे १, पळशी भालके ६, परिचारक  - काळे ७, गोपालपुर परिचारक - भालके १२,  आवताडे - परिचारक - भालके ३, भंडीशेगाव परिचारक - भालके - काळे ११, काळे २,  नारायण चिंचोली परिचारक ५, काळे - भालके ४, सोनके काळे - भालके ६, परिचारक ५, खरसोळी  परिचारक-:काळे ६, भालके ३, भोसे राजुबापु पाटील गट १७,  उपरी भालके - काळे ६,  परिचारक - पै साहेबराव नागणे गट ५, धोंडेवाडी भालके - काळे - परिचारक १०, अपक्ष १,  चळे परिचारक ५, भालके - परिचारक ८, तिसंगी काळे - भालके ८, परिचारक ३, वाखरी भालके - काळे ८, परिचारक ९, भाळवणी परिचारक - काळे - शिंदे १४, भालके - तिसरी आघाडी ३, रोपळे विकास प्रतिष्ठान १०, काळे २, करकंब विठ्ठल परिवार ९, पांडुरंग परिवार ८, कासेगाव परिचारक  - भालके - काळे १४, आवताडे - काळे - भालके २, अपक्ष १,  खर्डी भालके - परिचारक १५, गादेगाव सिध्दनाथ परिवर्तन पॅनेल ११, परिचारक ४, असे उमेदवार निवडुन आले आहेत. 

सुस्ते ४० तर रोपळेत २५ वर्षानंतर सत्तांतर....

तालुक्यातील सुस्ते ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप अप्पा घाडगे यांची ४० वर्षापासुन सत्ता होती. रोपळे ग्रामपंचायतीवर काळे गटाचे दिनकर कदम यांची २५ वर्षापासुन सत्ता होती. याचबरोबर चिलाईवाडी ग्रामपंचायतीवर विठ्ठल कारखानेचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण आबा पवार  यांची सत्ता होती. माञ या निवडणुकीत या दिग्गज नेत्यांच्या पॅनेलचा पराभव झाला.  

तीन सदस्यांना‌ समान. मते....

तालुक्यातील विटे, पिराची कुरोली, कौठाळी गावात एकमेकांच्या विरोधात लढणारे उमेदवारांना समान मते पडली. यामुळे तहसिलदारांनी याठिकाणी आरोही अभिजित अहिरे या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढुन विजयी उमेदवार घोषित केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई