सोमवारी आॅनलाईन पध्दतीने ८९२ घरांची होणार सोडत


नगरपालिकेच्या प्रधानमंञी आवास योजना बांधकामाची  स्थगिती उठली : नगराध्यक्षा साधना भोसले

पंढरपूर / प्रतिनिधि :   पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने प्रधानमंञी आवास योजनेंतर्गत  पहिल्या टप्यातील ९०० घरांचे बांधकाम सुरु  आहे. माञ तक्रारदारांनी दिशाभुल करुन बांधकामास स्थगिती मिळवली होती. माञ आ. प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे सदर स्थगिती शासनाने उठवली असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पञकार परिषदेत दिली. 
यावेळी उपनगराध्यक्षा  श्वेता डोंबे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,   नगरसेवक  गुरुदास अभ्यंकर,   अनिल अभंगराव, सुजित सर्वगोड, शिवाजी अलंकार, डी राज सर्वगोड,  तम्मा घोडके, विजय वर्पे आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.  
पुढे बोलताना नगराध्यक्षा भोसले म्हणाले की,  पंढरपूर नगरपालिका ब वर्गात आहे. शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी  प्रधानमंत्री आवास योजना राबवणेत येत आहे. माञ या योजनेस स्थगिती मिळालेनंतर  आ  प्रशांत परिचारक यांनी स्थगित उठवणेसाठी अजित पवार,  एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा केला.  यानुसार उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. सर्व चौकशी करुन अहवाल पाठविला.  विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यामार्फत देखील  विधानसभेत आवाज उठविला आहे. अहवाल पाहुन शासनाने ४ मार्च रोजी  स्थगिती उठविली.  येत्या सोमवारी ८९२  घरांची सोडत आॅनलाईन  काढण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले. 
मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर म्हणाले कि, 
१८० कोटींचा प्रकल्पाचे कामासाठी १७६ कोटींची निविदा प्राप्त झाली आहे. सदर घरांची किंमत नगरपालिकेने ठरवली नसुन .  राज्य शासनाने किंमत ठरवली असल्याचेही मानोरकर म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई