आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून थकीत व्याजाची रक्कम त्वरीत द्या : कल्याणराव काळे

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून चर्चा करताना चेअरमन कल्याणराव काळे.



पंढरपूर (प्रतिनिधी)  आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा उद्योजकांना गेले काही महिनेपासून मिळाणारे व्याज परताव्याची रक्कम खातेवर जमा झाली नाही. यामुळे अडचणीत आलेल्या उद्योजकांना महामंडळाकडून त्वरीत व्याज परताव्याची  रक्कम मिळावी अशी मागणी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निशिगंधा सहकारी बँकेचे चेअरमन तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रत्यक्ष भेटून केली.

मराठा समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात उभारी घ्यावी या करीता आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा युवकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून करण्यात येतो. याची प्रभावी अमंलबजावणी केल्यामुळे जिल्हयातील युवकांना याचा लाभ झालेला असून  महामंडळाने कर्जाची मर्यादाही वाढविलेली असल्याने लघु उद्योगाला चालना मिळालेली आहे.  दोन वर्षापुर्वी कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना तरुणांना फार मोठी अडचणीस सामोरे जावे लागत आहे.  अशातच महामंडळाकडून व्याज परताव्याची रक्कम वेळेवर खातेवर जमा न झाल्यामुळे उद्योजकांची आर्थिक कोंडी झालेली आहे. व्याज परताव्याची रक्कम नियमित केल्यास बँकेचे हप्ते भरणेस सुलभ होणार आहे. तरी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे थकीत असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधीत उद्योजकांच्या खातेवर त्वरीत जमा  व्हावी  असे निवेदनात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई