पोस्ट्स

उपरीतील दत्तात्रय नागणे यांचे अभिजीत पाटील गटात प्रवेश

इमेज
    प्रतिनिधी पंढरपूर /- सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा भाळवणी गटामध्ये उपरी गाव भेट दौरा असताना उपरीचे माजी सरपंच दत्तात्रय माणिकराव नागणे यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केला. एकेकाळी भालके व काळे गटात प्रामाणिकपणे काम केलेल्या सहकाऱ्याला आज अभिजीत पाटलांची ओढ लागलेने  कारखाना निवडणुकीत रंगत वाढली आहे.  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काळे भालके गटाचे पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कामावर नाराज होऊन आमच्याकडे येत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विश्वासावर सभासदांनी विश्वास ठेवला असून त्यांना चांगला ऊस दर देता आला त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाने देखील विठ्ठल प्रमाणे ऊसदर देण्यात येईल असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. यापुढे विठ्ठल प्रमाणे सहकार शिरोमणी ला दर दिला जाईल या अनुषंगाने काळे भालके गटातील अनेक पदाधिकारी अभिजीत पाटील गटात येण्यास उत्सुक आहेत अशी सर्वत्र चर्च...

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :   वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सोमवारी अचानक वादळी वारे व अवकाळी पा ऊसामुळे कारखान्याचे मालमत्तेचे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे  नुकसान झालेची माहिती कार्यकारी संचालक गायकवाड यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. कारखान्याचे कर्मचारी यांचे मोटार सायकल पार्कंग शेडवर झाड कोसळल्याने कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे.  सभासद साखर वाटप दुकानावरील लोखंडी पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जावून सभासदांना वाटून शिल्लक राहिलेली अंदाजे ३० ते ३३ क्विंटल साखर भिजलेली आहे. तसेच त्याचे शेजारी कामगार पतसंस्थेवरील संपूर्ण पत्रे उडून झेरॉक्स मशिन व कॉम्प्युटर व पतसंस्थेचे रेकॉर्ड भिजलेले असून व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान  झालेले आहे.  विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थी व स्टाफसाठी तयार केलेले सायकल व मोटार सायकल पार्कंग शेड वाऱ्यामुळे पुर्ण पडलेले आहे.  कारखान्याचे साखर गोडावून नंबर १६ व १७ वरील सिमेंटचे संपुर्ण पत्रे उडून गेलेने नुकसान झालेले आहे. आर.ओ. प्लॅन्टवरील नवीन पत्रे उडून गेलेले आहे...

अखेर कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांच्या अर्जावरील निकाल जाहीर

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :  भाळवणी ता पंढरपूर येथील वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.  प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावरच आक्षेप घेतलेने  प्रमुख नेत्यांची धाकधुक वाढली होती. अखेर आज सोमवारी  निवडणुक निर्णय अधिका-यांनी निकाल जाहीर केला असून  कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत. यामुळे ही निवडणुक चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. संचालक योगेश ताड यांनी बी पी रोंगे यांच्यावर भागाच्या प्रमाणात ऊस गाळपास आला नसल्याचा आक्षेप घेतला होता तर धनंजय काळे यांनी चेअरमन कल्याणराव काळे हे विठ्ठल कारखान्याचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेतला होता. तर दिपक पवार यांनी देखील भागाच्या प्रमाणात ऊस  गाळपास आला नसल्याचा आक्षेप होता. अखेर या प्रमुख उमेदवारांवरील हरकती फेटाळण्यात आल्या असून उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

घरात घुसून महिलेचा विनयभंग व तिच्या पतीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा

इमेज
  पंढरपूर/ प्रतिनिधि : घरात  टी.व्ही. पाहत असताना आरोपी  शहाजी भिमराव गायकवाड रा. करोळे ता. पंढरपूर याने घरात घुसून  फिर्यादीस तु मला फार आवडते असे म्हणुन  फिर्यादीस मनास लज्जा वाटेल असे कृत्य करीत विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीचा पती तेथे आला असता त्यांना शिवीगाळी, दमदाटी करून आरोपीने त्याचे हातातील ऊस तोडणीचे कोयत्याने फिर्यादीच्या डावे हातावर व उजवे पायाचे गुडघ्यावर मारून किरकोळ व गंभीर  जखमी केले. याप्रकरणी पंढरपूर येथील  प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी श्रीमती आर. जे. कुंभार यांनी आरोपीस  सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात  भा.द.वि.कलम  ३२६, ३५४, ३५४अ, ४५२, ३२४,५०४,५०६ शस्त्र अधिनियम ४,२५ सह महा. पो.अधि. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर गुन्हयाचा तपास करून पोलीस हेड कॉ./ बी.के. मोरे यांनी  यातील आरोपी विरूध्द मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकारी वकील  एम. एम. पठाण यांनी सरकार पक्षातर्फे ८  साक्षीदार तपासले आहेत. सदर साक्षीदारां...

रेशन दुकानातून मिळणार मोफत धान्य : तहसिलदार सुशील बेल्हेकर

इमेज
      पंढरपूर :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516  टन तांदूळ असे एकत्रित 869 टन धान्य वाटप करावे लागणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये 116 तर शहरात 30  असे एकूण 146 रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत 5 हजार 713 कार्डधारक असून 21 हजार 506 लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत 32 हजार 701 कार्डधारक असून 1 लाख 31 हजार 221 लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013  अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास  प्रतीकार्ड 15 किलो गहू 2 रुपये किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने अंत्योदय कार्डधारकास दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू 2 रुपये दराने व 3 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी 2023 पासून अंत्योद्य योजनेतील...

भंडीशेगाव येथे चोरी : पोलीस पथके तैनात

इमेज
  पंढरपूर :  भंडीशेगाव ता पंढरपुर येथील वासुदकर वस्ती  येथे अज्ञात चोरट्यांनी चार तोळे सोन्यासह रोख ७० हजारांची चोरी केली आहे. याबाबत  बाळासाहेब  सांळुखे यांनी गुन्हा दाखल केला असून चोरांच्या तपासासाठी पथके तैनात केल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.   याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की,  10 जानेवारी रोजी रात्री 11/30 वा सुमारास साळुंखे यांचे कुंटुबीय घरातील सर्व खोल्यांचे दरवाजांना कडया न लावता नुसते पुढे करून  झोपले होते.  पहाटे 5 वा चे सुमारास नेहमी प्रमाणे सकाळी काम करण्यासाठी उठले असता  घरासमोरील पोर्चमध्ये लहान मुलीचे खोटे गळ्यातील पडलेले दिसले.  यानंतर घरातील खोलीकडे पाहिले असता  चोरी झालेचे समजले. घरातील चार तोळे सोने व चांदीचे पैजन व रोख 70 हजार असे एकुण 2 लाख 74 हजार 500 रुपयांची चोरी झाली आहे.  घटनास्थळी पो नि धनंजय जाधव यांनी भेट देवून तपासासाठी पथके तैनात केली आहेत.

सोशल मीडियावर अनोळख्या व्यक्तीसोबत संपर्क टाळा- सहा. पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात

इमेज
पंढरपूर :  २ जानेवारी  ते ०७ जानेवारी २०२३ या दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे.  यानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने २ जानेवारी पासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.  पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे,  अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,   उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,  पो नि  मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.   अनवली येथील सतु कृष्णाकेनी विद्यालय  येथे सहाय्यक पोलीस  निरीक्षक आदिनाथ खरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक, वापर करताना  घ्यावयाची दक्षता, आपली वैयक्तिक व खाजगी माहिती आवश्यकता नसल्यास शेअर करू नये. सोशल  मीडिया वरून देण्यात येणारे वेगवेगळे आमिषे यांना बळी पडू नये. सोशल मीडियाच्या बाबतीत सजगता  हाच सुरक्षेचा उपाय असल्याचे यावेळी विद्यार्थ्याना सांगण्यात आले. गुड टच व बॅड टच याबाबत माहिती  सांगितली. महिला व विद्यार्थीनी कोणत्याही व्यक्ती छेडछाड करीत असेल तर निर्भया पथकाला अथवा  पोलीस स्टेशन ...

अवैध वाळु विरोधात तहसिलदारांची धडक कारवाई : सलग तीन दिवस कारवाईत सातत्य

इमेज
                     पंढरपूर :-  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे सलग तीन  दिवस  धडक कारवाई करत दोन  तराफा व 17 होड्या नष्ट केल्या असल्याची माहिती तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली.             भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पंढरपूर महसूल विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाद्वारे पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी भरारी  पथकांची  नेमणूक केली आहे.               भीमा नदी पात्रातील मौजे इसबावी, भटुंबरे येथे गुरुवार दि.29 डिसेंबर रोजी अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली....

पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पँनेलचा जल्लोष

इमेज
   पंढरपूर-  दि पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी समविचारी गटाचे सर्व अठरा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक पी.सी.दुरगुडे यांनी दिली. या निर्णयानंतर सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण करीत ङ्गटाक्याची अतिषबाजी केली. पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापन करून याव्दारे सर्व सतरा जागेसाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीची प्रक्रीया पूर्ण झाली व यावर आज गुरूवारी सकाळी निर्णय देण्यात आला. सहायक निबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये केवळ सत्ताधारी गटातील अठरा उमेदवारांची नावे होती. निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक असणारी प्रक्रीया विरोधी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी पूर्ण केली नसल्याने सदर अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये उमेदवाराची पंढरपूर अर्बन बँकेत एक लाख रूपयाची ठ...

पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून कायापालट

इमेज
    पंढरपूर :- पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पंढरपूर सबजेलची स्वच्छता व  रंगरगोंटी तसेच कैद्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्थेसह आदी आवश्यक कामे लोकसहभातून केली असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी दिली.              पंढरपूर सबजेलमध्ये 7 कारागृह कोठड्या व दोन व्हरांडे  आहेत. या ठिकाणच्या  आतील व बाहेरील भिंतींना रंगरंगोटी, दरवाजांना रंग, जुन्या लाकडी फर्निचरमधून नवीन खुर्च्या व बाकडे तयार करण्यात आली. तसेच कोठडीतील आरोपीना स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.  कोठडीत कैद्यांना सकारात्मक उर्जा मिळावी त्यांच्या आचरणात बदल व्हावा यासाठी समोरील भिंतीवर देवदेवतांचे  भिंती चित्र तसेच स्वच्छ हवा मिळावी यासाठी तुळशी कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पावसामुळे दिवसांत कोठडीच्या भिंती ओल्या झाल्यावर विद्युत प्रवाह भिंतीत उतरण्याची श्यकता असल्यामुळे  जुन्या झालेले विद्युत उपकरणे बदलून त्याठिकाणी नविन विद्युत उपकरणे टाकण्यात आली. असेही नायब...