संत नामदेव महाराजांच्या वंशजावरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन
विश्व वारकरी सेनेचे आमरण उपोषण स्थगित गुन्हे मागे घेण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी दिले आश्वासन पंढरपूर / प्रतिनिधि वारकरी संप्रदायाला भजन कीर्तनास विना अट परवानगी द्यावी , राज्यातील मंदिरे खुली करावीत आणि संत नामदेव महाराजांच्या वंशजावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आदी मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पंढरपूरमध्ये कालपासून सुरू केलेले आमरण उपोषणा आज प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर स्थगित करण्यात आले . प्रांताधिकारी सचिन ढोले विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप जगन्नाथ महाराज देशमुख, हभप गणेश महाराज शेटे, हभप तुकाराम महाराज चवरे आदीमध्ये सविस्तर चर्चा होऊन मागण्याचे निवेदन शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला . महाद्वार काल्या दिवशी संत नामदेवांच्या वंशज व मदन महाराज हरिदास यांचेवर दाखल केलेला गुन्हा देखील मागे घेण्यास प्रशासनाने तयारी दाखवल्यानंतर तोडगा निघाला . वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार होत नसल्याने तात्काळ मागण्या मान्य होत नसल्याने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील २९ जिल्ह्यातुन १ लाख वारकरी पंढरपूरमध्ये ...