पंढरपूरकरांना दिलासा : १४७१ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत
प्रशासनाचे योग्य नियोजन अन नागरिकांचे सहकार्य पंढरपूर / प्रतिनिधि : जुन महिन्यापासुन पंढरपूर शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनाला शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे तब्बल १४७१ रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी परतले आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९% झालेने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्यापासुन तालुक्यात पहिला रुग्ण सापडलेने एकच खळबळ उडाली होती. यावेळी देखील प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे एक महिन्यात आतच पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झाला होता. माञ जुनच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली होती. आज अखेर पंढरपूर शहर व तालुक्यात एकुण २१३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी १४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असुन ६१९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी शहरातील ३४५ व तालुक्यातील २७४ रुग्णांचा समावेश आहे. याचबरो...